सुस्वागतम

मुंबई गृहनिर्माण मंडळ व क्षेत्रविकास मंडळ मुंबई ५६ वसाहतीपैकी सर्वात जास्त जागेवार म्हणजेच ३३ एकरवर बांधलेली अभ्युदयनगर ही एक मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागातील म्हाडाची वसाहत आहे. सदर वसाहतीत एकुण ४७ इमारती वर्ष १९५८ ते १९६४ या कालावधीत मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने बांधलेल्या आहेत. ऐकुण ४६ इमारतीत ३१८६ निवासी व १६४ व्यापारी गाळे आहेत. अभ्युदयनगरमधील एकुण ४६ इमारतीमध्ये स्वतंत्रपणे नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. अभ्युदयनगरमधील २१५४ निवासी गाळे मुंबई गृहनिर्माण मंडळाने मिल कामगारांना भाडेतत्वावर वाटप केलेले होते व उर्वरित १०३२ निवासी गाळे हे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय निवासस्थाने म्हणुन उपलब्ध करुन दिलेली होती. १९९१-९२ मध्ये महाराष्ट्र शासनाने अभ्युदयनगरमधील निवासी गाळे व्यापारी गाळे मालकी तत्वावर देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार मुंबई गृहनिर्माण मंडळाने त्याची अंमलबजावणी केलेली आहे.

अभ्युदयनगरमधील सर्व इमारती ह्या शेजारी शेजारी बांधलेल्या आहेत, त्यामुळे सर्व इमारतींचे अत्यंत एकोप्याचे नाते संबंध जुळलेले आहेत.

सन १९८५ च्या दरम्यान महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री कोट्यातून कलाकार, पत्रकार व इतर मान्यवरांना सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापनेकरिता मोकळी जागा वितरित केली व त्यावर १६ निवासी व ८ वाण्यिज्य गाळे असे एकुण २४ गाळे असलेली अतुल रायगड सहकारी गृहनिर्माण संस्था नावाची इमारत मालकी तत्वावर उच्च उत्पन्न गटासाठी बांधली.

अभ्युदयनगरमधील ४७ इमारतीमधील सहकारी गृहनिर्माण संस्था ह्या त्यांचे इमारतीपुरत्या अडी-अडचणी सोडविण्याकरिता सक्षम आहेत, परंतु अभ्युदयनगरमध्ये सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना एकत्रित आणणारी व मागदर्शन करण्याकरिता एका शिखर संस्थेची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेता तत्कालीन अभ्युदयनगरमधील समाजसेवकांनी अभ्युदयनगरमध्ये "अभ्युदयनगर भाडेकरु संघ" स्थापन केला व त्याचे वर्ष २००६-०७ मध्ये नामकरण करुन "अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थाचा संघ" शासकीय दरबारी नोंदणीकृत करुन घेतला. सदर संघाचे कार्यालयाकरिता मुंबई गृहनिर्माण मंडळाने समाज मंदिर हॉल येथे कार्यालय उपलब्ध करून दिले.

१९९५ साली ३६ निवासी गाळे असलेली अभ्युदय नगर वैशाली सहकारी गृहनिर्माण संस्था ही इमारत अल्प उत्पन्न गटासाठी बांधली व ती मालकी तत्वावर वितरित करण्यात आली.

संस्थेचे उद्देश

अभ्युदयनगरमध्ये स्थापन झालेल्या संघाचे उद्देश्य खालीलप्रमाणे आहेत.

१) अभ्युदय नगर कार्यक्षेत्रातील सभासद संस्था आणि रहिवाशी यांचे कल्याणार्थ व आरोग्य उत्तम राखण्यासाठी नागरी समस्या सोडविणे व त्याकरिता आवश्यक त्या उपायांची व मार्गाची योजना करणे व कार्यकर्त्यांची बांधणी करणे.

२) अंतर्गत रस्ते, गटारे, पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा याची देखभाल विधेयक दुरुस्ती व संबंधित पुरवठा संस्थेची देयके देणे.

३) अभ्युदयनगरमधील रहिवाश्यांचे व जनतेचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.

४) समाज मंदिर हॉल, वाचनालय व व्यायामशाळा चालविणे.

५) संस्थेचे व्यवस्थापन आणि सामाजिक सोयी व सुविधा आणि कायदेविषयक आणि तांत्रिक बाबी संबंधात सभासद संस्थांना मार्गदर्शन करणे.

६) संस्थेचे उद्येशपूर्तीकरिता सदर सभासद संस्थांच्या नियतकालिका / वळोवेळी सभा व परिषद भरविणे.

७) सदर संघ आणि सभासद संस्थेचे मिळकतीचे संरक्षणाकरीता सुरक्षा उपाय योजणे.

८) अभ्युदयनगरातील रहिवाशांमध्ये एकमेकांशी सामाजिक संबंध यावेत, सुधारावेत व वाढीस लागावेत म्हणुन स्पोर्ट क्लब स्थापुन खेळासाठी मैदानाची सोय करणे, वळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी खेळाची स्पर्धा, नाट्य स्पर्धा, स्नेह संमेलन इत्यादि आयोजित करणे आणि पुरस्कार करणे.

९) राष्ट्रीय उत्सव पार पाडणे.

१०) शिक्षणातील विशेष प्राविण्याबद्दल विद्यार्थ्यांना पारितोषिके शिष्यवृत्त्या देणे.

११) अभ्युदयनगरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या कडेने वृक्षारोपण करणे व त्याचे रक्षण करणे.

१२) अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थाचा संघ मर्यादित या संघीय संघ संस्थेच्या सभासद संस्थांच्या सर्वसाधारण सभेने ठरावानुसार त्यांच्या संस्था इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी, सभासदांसाठी घर, इमारत बांधणे, पुनर्रचना, पुनर्बांधनी / पुनर्विकास करणे आणि त्याबाबतची धोरणे आखणे व अंबलबजावणी करण्यासाठी संघाने समन्वय व मार्गदर्शक म्हणुन कार्य करणे, काम पाहणे तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९(अ) अन्वयेचे शासन परिपत्रक ०३ जानेवारी २००९ च्या प्रक्रिया राबविण्यासाठी सर्व सभासद संस्थांच्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी सभासद संस्थांचे प्रतिनिधीत्व करणे.

१३) पुनर्विकासाचे करारपत्रे , समझोता पत्ते व आवश्यक ते तद्नुषंगित पुनर्विकास संबंधित कायदेशीर कागदपत्रे व अभिहस्तांतरण कागदपत्रे इत्यादी करणे सहकार्य / विधिसाह्य करणे तसेच संघ कार्यक्षेत्राअंतर्गत वसाहतींच्या अभिन्यासावरील भूखंड, सुविधा भूखंड, अधिकारी क्षेत्रातील सक्षम प्राधिकरणाच्या व संस्थांचे या मंजुरीने विकसित करणे.



संघाची कार्यकारिणी

अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थाचा संघ (मर्या.) च्या स्थापनेपासुन ते आजतागायत कार्यकारिणीची स्थिति खालीलप्रमाणे.

दि. १२/०२/२००७ या दिवशी संघ पंजिकृत झाला.

२००७ ते २००८ या वर्षाकरिता हंगामी व्यावस्थापन समितीची निवड.

२००८-०९ ते २०१३-१४ पहिली पंचवार्षिक निवडणुक पार पडली व पदाधिकारी निवडले.

२०१४-१५ कार्यकारिणीस मुदत वाढ.

२०१५-१६ ते २०२०-२१ व्यावस्थापन समितिची दुसरी पंचवार्षिक निवडणुक दिनांक २७/०३/२०१६ या दिवशी झाली व निवडुन आलेले पदाधिकारी खालीलप्रमाणे.

संघाचे सन २०१५-२०१६ ते २०२०-२०२१ या कालावधीतील कार्यकारिणी

श्री. नंदकुमार काटकर

अध्यक्ष

श्री. विलास सावंत

उपाध्याक्ष

श्री. जयसिंग भोसले

सरचिटणीस

श्री. अनिल नाईक

खजिनदार

श्री. भरत वीर

सहचिटनीस

श्री. अनंत केळुसकर

सहचिटनीस

श्री. स्टॅन्ली पालन्ना

सदस्य

श्री. केतन चव्हाण

सदस्य

श्री. नंदकुमार चव्हाण

सदस्य

श्री. राम बोडके

सदस्य

श्री. दत्तात्रय आमडोस्कर

सदस्य

श्री. प्रभु नाथ

सदस्य

श्री. भरत कारंडे

सदस्य

श्रीमती वैशाली शहाणे

सदस्या

तुमची मते, प्रश्न आणि सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्याकरीता आम्हाला संपर्क करा