सुस्वागतम

मुंबई गृहनिर्माण मंडळ व क्षेत्रविकास मंडळ मुंबई ५६ वसाहतीपैकी सर्वात जास्त जागेवार म्हणजेच ३३ एकरवर बांधलेली अभ्युदयनगर ही एक मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागातील म्हाडाची वसाहत आहे. सदर वसाहतीत एकुण ४७ इमारती वर्ष १९५८ ते १९६४ या कालावधीत मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने बांधलेल्या आहेत. ऐकुण ४६ इमारतीत ३१८६ निवासी व १६४ व्यापारी गाळे आहेत. अभ्युदयनगरमधील एकुण ४६ इमारतीमध्ये स्वतंत्रपणे नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. अभ्युदयनगरमधील २१५४ निवासी गाळे मुंबई गृहनिर्माण मंडळाने मिल कामगारांना भाडेतत्वावर वाटप केलेले होते व उर्वरित १०३२ निवासी गाळे हे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय निवासस्थाने म्हणुन उपलब्ध करुन दिलेली होती. १९९१-९२ मध्ये महाराष्ट्र शासनाने अभ्युदयनगरमधील निवासी गाळे व्यापारी गाळे मालकी तत्वावर देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार मुंबई गृहनिर्माण मंडळाने त्याची अंमलबजावणी केलेली आहे. अभ्युदयनगरमधील सर्व इमारती ह्या शेजारी शेजारी बांधलेल्या आहेत, त्यामुळे सर्व इमारतींचे अत्यंत एकोप्याचे नाते संबंध जुळलेले आहेत.

संस्थेचे उद्देश

अभ्युदयनगरमध्ये स्थापन झालेल्या संघाचे उद्देश्य खालीलप्रमाणे आहेत.

१) अभ्युदय नगर कार्यक्षेत्रातील सभासद संस्था आणि रहिवाशी यांचे कल्याणार्थ व आरोग्य उत्तम राखण्यासाठी नागरी समस्या सोडविणे व त्याकरिता आवश्यक त्या उपायांची व मार्गाची योजना करणे व कार्यकर्त्यांची बांधणी करणे.

२) अंतर्गत रस्ते, गटारे, पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा याची देखभाल विधेयक दुरुस्ती व संबंधित पुरवठा संस्थेची देयके देणे.

३) अभ्युदयनगरमधील रहिवाश्यांचे व जनतेचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.

४) समाज मंदिर हॉल, वाचनालय व व्यायामशाळा चालविणे.



तुमची मते, प्रश्न आणि सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्याकरीता आम्हाला संपर्क करा